शिकागो येथील हॉटेलमध्ये अनिष्ट शक्तीचे वास्तव्य

एअर इंडियाच्या कर्मचार्‍यांचा दावा

नास्तिकवादी मंडळींना याविषयी काय म्हणावयाचे आहे ?

शिकागो – येथील एका हॉटेलच्या खोल्यांमध्ये भीतीदायक आवाजासह अनिष्ट शक्ती जाणवल्या, असा दावा एअर इंडियाच्या क्रूच्या सदस्यांनी केला. याविषयी केबिन क्रूच्या उपप्रमुखाने हॉटेलच्या व्यवस्थापनाला पत्र लिहून माहिती दिली आहे. बहुतांश क्रू सदस्यांना भीती वाटल्याने त्यांनी एकत्रच विश्रांती घेणे पसंत केले. त्या दिवसापासून क्रू सदस्यांना व्यवस्थित झोप लागली नाही आहे. या हॉटेलमध्ये हा अनुभव एअर इंडियाच्या क्रू सदस्यांनीच घेतला, असे नाही तर यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना इतरांनीही अनुभवल्या आहेत. भविष्यात या शहरात आल्यास निवासासाठी अन्य हॉटेलमध्ये निवासाची व्यवस्था करण्याची मागणी एअर इंडियाच्या क्रू सदस्यांनी केली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now