सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती निर्मित धर्मसत्संगांचे केबल अथवा दूरचित्रवाणी यांवरून प्रसारण करण्याचे नियोजन करावे !

जिल्हासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना

२५.८.२०१७ या दिवशी श्री गणेशचतुर्थी आहे. त्या निमित्ताने या संदर्भातील महत्त्व विशद करणारा हिंदी भाषेत विशेष धर्मसत्संग सिद्ध करण्यात आला आहेत. या धर्मसत्संगांतर्गत धार्मिक कृतियोंका शास्त्र या विषयाचे ७ धर्मसत्संग आहेत, त्याशिवाय ऋषिपंचमी, हरतालिका आणि अनंत चतुर्दशीआहेत. अध्यात्मशास्त्र या विषयाचे ८ धर्मसत्संग आहेत. या सत्संगांचा कालावधी प्रत्येकी २८ मिनिटे असा आहे.

या धर्मसत्संगांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार होण्यासाठी साधकांनी पुढील प्रयत्न करावेत.

१. स्थानिक केबल अथवा दूरचित्रवाणी यांवरून या धर्मसत्संगांचे प्रसारण करण्याचे नियोजन करावे.

२. गावोगावी चालू असणार्‍या धर्मशिक्षणवर्गात आवश्यकतेनुसार हे धर्मसत्संग दाखवावेत.

३. सध्या सर्वत्र चालू असलेल्या हिंदु धर्मजागृती सभा, हिंदू अधिवेशने यांमधून जोडल्या जाणार्‍या धर्माभिमान्यांना हे धर्मसत्संग आसपासच्या गावांत दाखवण्याची सेेवा द्यावी.

४. समाजातील कार्यक्रमांमध्येही हे धर्मसत्संग दाखवण्याचे नियोजन करू शकतो.

धर्मसत्संग एम्.पी. ४ (MP4) फॉरमॅटमध्ये उपलब्ध असून त्याची लिंक जिल्ह्यांना पाठवण्यात आली आहे. वाचक, हिंदुत्वनिष्ठ किंवा हितचिंतक यांना हे धर्मसत्संग आपला गाव, संघटना, स्थानिक मंदिर, तसेच अन्य ठिकाणी दाखवायचे असल्यास त्यांनी आपल्या भागातील उत्तरदायी साधकाकडून ही लिंक घ्यावी.