दंगलीला कथित निमित्त ठरलेल्या अल्पवयीन हिंदु मुलाला कारागृहातून बालसुधारगृहात पाठवले

बंगालमधील बशीरहाट दंगल प्रकरण

हिंदु संहतीच्या अधिवक्त्यांच्या न्यायालयीन लढ्याला यश

बंगालला बांगलादेश होण्यापासून वाचवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

कोलकाता – काही दिवसांपूर्वी बंगालममध्ये उत्तर २४ परगना जिल्ह्यातील बशीरहाट गावात धर्मांधांनी हिंदूंवर भीषण आक्रमण करून सलग ३ दिवस त्यांची घरे आणि दुकाने यांची अपरिमित हानी केली. या धर्मांधांच्या हिंसाचाराला एका अल्पवयीन हिंदु मुलाचे ‘फेसबूक’वरील कथित लिखाण निमित्त ठरले होते. या प्रकरणी पोलिसांनी हिंदु मुलाला साधारण गुन्हेगाराप्रमाणे कारागृहात डांबले होते. या विरोधात हिंदु संहतीच्या अधिवक्त्यांनी कायदेशीर लढा दिला. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने या मुलास कारागृहातून बालसुधारगृहात पाठवण्यात आले. (बंगालमध्ये हिंदु संहती ही हिंदुत्वनिष्ठ संघटना नेहमीच हिंदूंच्या पाठीमागे उभी रहात असल्यानेे हिंदूंना तिचा आधार वाटतो ! – संपादक)

१. बंगाल पोलिसांनी हिंदु मुलगा अल्पवयीन असतांना तसे न्यायालयात कोणतेही कागदपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्याला कारागृहात पाठवण्यात आले.

२. या निर्णयाच्या विरोधात हिंदु संहिता या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या अधिवक्त्यांनी मुलाला बालसुधारगृहात पाठवण्याची न्यायालयाला विनंती केली. दंगलखोरांनी लावलेल्या आगीत मुलाच्या वडिलांचे घर भस्मसात झाले होते. त्यामुळे अधिवक्त्यांना मुलाच्या जन्मतारखेचा पुरावा सादर करण्यात अपयश आले.

३. त्यानंतर हिंदु संहतीच्या कार्यकर्त्यांनी जळालेल्या घरातील सर्व साहित्य परत पडताळले आणि महत्प्रयासाने मुलाच्या जन्मतारखेचा दाखला मिळवला. याविषयी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बालाधिकार संरक्षण आयोगाला माहिती देण्यात आली; मात्र त्यांनी याची कोणतीही नोंद घेतली नाही. (बंगालच्या मुख्यमंत्री ममताबानो या तेथील हिंदूंसाठी नसून केवळ धर्मांधांसाठी कार्यरत आहेत, हे लक्षात घ्या ! – संपादक)

४. या खटल्याची पुढील सुनावणी ५ ऑगस्ट २०१७ या दिवशी झाली. त्या वेळी हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांनी मुलाच्या जन्मतारखेचा दाखला न्यायालयात सादर केला. पोलिसांनाही त्या दाखल्यास खोटे ठरवणे शक्य झाले नाही. शेवटी न्यायालयाने हिंदु मुलाला बालसुधारगृहात पाठवण्याचा आदेश दिला.

५. मुलाचा जामीन घेणे शक्य असूनही धर्मांधाच्या भीतीने मुलाच्या पालकांनी जामीन घेतला नाही. ‘तो पोलीस संरक्षणातच सुरक्षित राहील’, असे त्यांना वाटले. (धर्मांधांच्या या दहशतीवरून बंगाल भारतात आहे कि बांगलादेशमध्ये असा प्रश्‍न पडल्यावाचून रहात नाही ! – संपादक)

 


Multi Language |Offline reading | PDF