हिना तलरेजा या धर्मांतरित युवतीची तिच्या धर्मांध पतीकडून सामूहिक बलात्कार करून हत्या

हिना तलरेजा हत्या प्रकरण

लव्ह जिहादची भीषणता जाणा !

प्रयाग – येथील हिना तलरेजा या युवतीवर तिच्या धर्मांध पतीने मित्रांसह सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तिचा पती अदनान खान याला अटक करण्यात आली असून दोघे जण फरार आहेत.

१. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील पीडित हिना तलरेजा हुक्का पार्लरमध्ये काम करत होती. तेथेच तिची अदनान खानशी ओळख झाली. त्यानंतर हिनाने अदनानशी विवाह करून धर्मांतर केलेे.

२. एका वर्षानंतर दोघांचे पटेनासे झाले. त्यामुळे ६ मासांपासून ते वेगळे रहात होते. त्यानंतर अदनानने तिची क्षमा मागून तिची समजूत काढली होती.

३. ४ जुलै या दिवशी अदनानने हिनाला हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी दूरभाषवरून बोलावून घेतले. ती हॉटेलात पोहोचल्यावर हिनासह अदनान आणि त्याच्या २ सहकार्‍यांनी कौशंबी येथील धाब्यावर जेवण घेतले.

५. कौशंबीवरून परत येत असतांना रात्री वाटेत अदनान आणि त्याचे सहकारी यांंनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर अदनाने तिची गोळी मारून हत्या केली.

हिंदुत्वनिष्ठ करत असलेल्या ‘लव्ह जिहाद’विषयी जनजागृतीला नृत्यांगनेकडून विरोध

लक्षावधी हिंदु युवतींचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍या ‘लव्ह जिहाद’ला समर्थन देणार्‍या सेठी समाजद्रोहीच होत !

कर्णावती (अहमदाबाद) – हिंदुत्वनिष्ठ संघटना ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात समाजात जनजागृती करत आहेत. या जनजागृतीला विरोध दर्शवण्यासाठी गुजरातमधील प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना आणि ‘कन्फ्लिक्टोरियम’च्या संस्थापिका अवनी सेठी यांनी ठिकठिकाणी नृत्य केले.

कर्णावतीच्या काही रस्त्यांवरील दर्शनी भिंतींवर ‘हिंदु मुलींनो लव्ह जिहादपासून सावध रहा’ असा मजकूर लिहण्यात आला आहे. या मजकुरांच्या समोर सेठी यांनी ‘मुघल-ए-आजम’ चित्रपटातील जब प्यार किया तो डरना क्या… या गाण्यावर नृत्य करून हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या जनजागृतीला विरोध केला. (प्रेम आणि द्वेष यांच्यातील भेदही न समजणार्‍या सेठी यांनी ‘लव्ह जिहाद’मागील सत्य जाणून घेणे आवश्यक ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now