(म्हणे) ‘विवाहाच्या नोंदणीसाठी आग्रह धरणे धार्मिक स्वातंत्र्याच्या विरोधात !’ – दारूल उलूम देवबंद

उत्तरप्रदेश सरकारने विवाह नोंदणी बंधनकारक केल्याचे प्रकरण

विवाहाची नोंदणी केल्याने प्रत्येक मुसलमानाने किती विवाह केले आहेत, हे उघड होणार आहे. ‘ते होऊ नये; म्हणूनच त्यांचा या निर्णयाला विरोध होत आहे’, हे न समजायला हिंदू दूधखुळे नाहीत !

सहारनपूर (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने सर्व धर्मियांसाठी विवाह नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे दारूल उलूम देवबंद संतप्त झाले आहे. ‘विवाहाच्या नोंदणीसाठी आग्रह धरणे धार्मिकस्वातंत्र्याच्या विरोधात आहे’, असे दारुल उलूमने म्हटले आहे.

इस्लामी शिक्षणाचे सर्वांत मोठे केंद्र असलेले दारूल उलूमचे मोहतमिम मुफ्ती अबुल कासिम नौमानी म्हणाले, आम्ही विवाह नोंदणीच्या विरोधात नाही; पण नोंदणी न करणार्‍यांना दंड करणे किंवा त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणे योग्य नाही. विवाहाची नोंदणी न करणार्‍यांना सरकारी सुविधांपासून वंचित ठेवण्याचा आदेश देणे चुकीचे आहे.


Multi Language |Offline reading | PDF