श्री महालक्ष्मी मंदिराचा खजिना जनतेसमोर आणावा !

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे मागणी

कोल्हापूर, ८ ऑगस्ट (वार्ता.) – करवीनिवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर भ्रष्टाचारसह विविध आरोपांनी सध्या गाजत आहे. तरी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने श्‍वेतपत्रिका काढून देवीच्या खजिन्यात नेमके किती दान आहे, याविषयी खुलासा करून तो जनतेसमोर आणावा, या मागणीचे निवेदन ७ ऑगस्टला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी श्री. अविनाश सुभेदार यांना देण्यात आले.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, मंदिराचे व्यवस्थापन देवस्थान समिती करते; मात्र आजवर कोणत्याच प्रशासनाने जनतेसमोर देवीला आलेली देणगी, दागिने, रक्कम, खजिन्यांची माहिती उघड केलेली नाही. तरी याविषयी सविस्तर चौकशी होऊन त्याचा ताळेबंद जनतेसमोर मांडावा.


Multi Language |Offline reading | PDF