ऑस्ट्रेलियामध्ये एका शाळेने पगडी घालत असल्याने शीख मुलाला प्रवेश नाकारला

शीख पालकांचा शाळेच्या विरोधात कायदेशीर लढा

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) : सिंधक सिंह अरोरा हा ५ वर्षांचा शीख मुलगा पश्‍चिमोत्तर मेलबर्न येथील मेल्टन क्रिश्‍चन विद्यालयातून शिक्षणाला प्रारंभ करणार होता; परंतु मुलगा शीख पंथानुसार पगडी घालत असल्यामुळे संबंधित शाळेने त्याला  शाळेत दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे मुलाच्या पालकांनी शाळेच्या विरोधात कायदेशीर कारवाईचा लढा चालू केला आहे. (कुठे मुलाच्या पगडीसाठी शाळेच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणारे शीख पालक, तर कुठे मुलांना धर्मापासून लांब नेणारे हिंदू ! – संपादक) एबीसी न्यूजच्या वृत्तानुसार मुलाची पगडी शाळेच्या गणवेशाची जुळत नाही, तसेच शाळेचा नियम विद्यार्थ्यांना धार्मिक कारणावरून डोके झाकण्यास अनुमती देत नाही. अरोरा कुटुंबाच्या मते शाळेने धार्मिक आधारावर त्यांच्या मुलाशी भेदभाव करून देशाच्या समान अधिकाराशी संबंधित कायद्याचे उल्लंघन केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF