अमरनाथ यात्रेवरील आक्रमणातील आतंकवादी ठार

श्रीनगर – अमरनाथ यात्रेकरूंवरील आक्रमणात सहभागी असलेल्या पाकिस्तानी आतंकवाद्याला सैनिकांनी ७ ऑगस्टच्या दिवशी चकमकीत ठार केले; मात्र या वेळी २ आतंकवादी पळून गेले. यातील एक घायाळ झाला आहे. हे तिघेही लष्कर-ए-तोयबाचे आतंकवादी आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून शस्त्रसाठाही कह्यात घेतला. ठार झालेल्या आतंकवाद्याची ओळख पटली असून त्याचे नाव उमर असे आहे. तो मूळचा पाकिस्तानचा रहिवासी आहे. या यात्रेवरील आक्रमण लष्कर-ए-तोयबाने केले होते. या प्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF