अशा प्रकारे रक्षाबंधन साजरा होतो !

कु. मधुरा भोसले

आज आहे श्रावण पौर्णिमा ।

रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा ॥

शब्द न सुचती देण्या उपमा ।

आनंदाला नाही सीमा ॥ १ ॥

भावा बहिणीचे अनुपम नाते ।

पवित्रतेची साक्ष देते ॥

दोन जिवांना प्रेमाने जोडते ।

परस्परांची मने जुळवते ॥ २ ॥

बहिण भावाला राखी बांधते ।

भावाप्रती कृतज्ञता व्यक्त करते ॥

बहिण भावाला प्रेमाने ओवाळते ।

हृदयातील प्रेम कृतीतून व्यक्त करते ॥ ३ ॥

धाग्यांच्या माध्यमातून बंध जुळतात ।

मनातील विचार न कळत कळतात ॥

राखीतून भावना साकार होतात ।

भावाबहिणीला जोडून ठेवतात ॥ ४ ॥

बहिणीला भावाचा आधार मिळतो ।

भाऊ तिच्या रक्षणाचे वचन देतो ॥

आणि बहिणीला ओवाळणीही देतो ।

अशाप्रकारे रक्षाबंधन साजरा होतो ॥ ५ ॥

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.७.२०१७)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now