भारतियांनो, चीनच्या विरोधात संघटित व्हा !

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

अहंकाराने उन्मत्त असलेल्या चीनची नांगी ठेचण्यासाठी भारतियांनो एकत्र येऊन आपापल्या साधनामार्गानुसार आध्यात्मिक प्रयत्न करा !

प.पू. पांडे महाराज

अहंकाराने उन्मत्त असलेला चीन भारतावर आक्रमण करण्याच्या सिद्धतेत आहे. याविषयी चीन सामंजस्यानेे न वागता दुष्ट प्रवृत्तीने वागत आहे. चीनने भारतावर आक्रमण केल्यास भारतातील सर्व जनतेवर त्याचा घातक परिणाम होणार आहे. आपण सर्व भारतीय एक आहोत. हे संकट सर्व भारतियांवर असल्यामुळे चीनच्या विरुद्ध आवाज उठवणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, हे लक्षात घेऊन आणि हे संकट टळण्यासाठी प्रत्येक भारतियाने आपापल्या साधनामार्गानुसार उपासना करून याला विरोध करणे आवश्यक आहे; कारण सृष्टीच्या अंतरस्थ असणारी चैतन्यरूपी कार्यशक्ती हीच महत्त्वाची असल्यामुळे तिलाच आपापल्या माध्यमातून प्रार्थना करणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने आपापल्या साधनामार्गानुसार उपासना करावी, तसेच चीनमध्ये बनवलेली उत्पादने खरेदी करणे टाळावे. अशा प्रकारे कृती केल्यास आपण सर्व भारतीय एक आहोत, असे दिसून येेईल. सर्व भारतियांनी एकत्रित येऊन चीनला विरोध करणे, ही राष्ट्ररक्षणाची संधी आहे. याचा परिणाम होऊन भारतीय सैनिकांचे आत्मबळ वाढून आणि चीनच्या सैनिकांचे आत्मबळ न्यून होऊन आक्रमण टळू शकते.

– प.पू. परशराम पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.८.२०१७)