राखीपौर्णिमेला बहिणीला अशाश्वत भेट देण्याऐवजी चिरंतन तत्त्वाचा प्रसार करणाऱ्यां नियतकालिक सनातन प्रभातचे वाचक बनवा आणि ज्ञानामृत असलेली अनोखी ओवाळणी द्या !

राखीपौर्णिमेनिमित्त सर्वत्रच्या हिंदु बांधवांना आवाहन !

१. राखीपौर्णिमेचे महत्त्व !

श्रावण पौर्णिमा, म्हणजेच राखीपौर्णिमा ! या वर्षी ७.८.२०१७ या दिवशी राखीपौर्णिमा आहे. हिंदु संस्कृतीनुसार या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भावाने आपले रक्षण करावे, यासाठी बहीण या दिवशी भावाला ओवाळते आणि राखी बांधते. भाऊ बहिणीला पैसे अथवा तिला उपयोगी पडेल, अशी वस्तू ओवाळणी म्हणून देतो.

२. येणाऱ्यां काळाला धैर्याने सामोरे जाण्यासाठी आपल्या भगिनीला सक्षम बनवण्याकरता सनातन प्रभातचे वाचक बनवा !

सद्य:स्थितीत सामाजिक परिस्थिती बिकट असल्याने स्त्रियांंना नानाविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांविषयी त्यांना अवगत करून सतर्क करणे, ही काळाची आवश्यकता आहे. हे समाजोपयोगी कार्य करण्यासाठी नियतकालिक सनातन प्रभात अविरत कार्य करत आहे. स्त्रियांमधील सतर्कता वाढवणारे, त्यांना स्व-संरक्षणासाठी उद्युक्त करणारे, तसेच अनुचित प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी साधनेचा आधार देणारे वाचनीय लेख या नियतकालिकात नियमित प्रसिद्ध केले जातात. त्यामुळे कोणत्याही कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याचे मनोधैर्य त्यांच्यात निर्माण होत आहे.  वाढत्या असुरक्षिततेमुळे भयाच्या सावटाखाली वावरणाऱ्यां आपल्या माता-भगिनींना सनातन प्रभात नियतकालिकाचे वर्गणीदार बनवून त्यातील अमूल्य माहिती वाचण्यास प्रवृत्त करणे, यापेक्षा अन्य कोणती श्रेष्ठ ओवाळणी असेल ?

वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांनी आपल्या बहिणीला वाचक बनवण्याची इच्छा दर्शवल्यास साधकांनी लक्षात घ्यावयाची सूत्रे

दैनिक वितरणाची व्यवस्था असलेल्या ठिकाणी दैनिक चालू करण्यास प्राधान्य द्यावे. तसे शक्य नसल्यास साप्ताहिक, पाक्षिक अथवा मासिक सनातन प्रभात चालू करू शकतो. नियतकालिक वितरणाची व्यवस्था नसल्यास जिज्ञासूंना पोस्टाद्वारे अंक पाठवता येईल. नियतकालिक चालू करतांना त्यांच्या भाषेचा विचार करणे अपेक्षित आहे.  सनातन प्रभातच्या नूतन संकेतस्थळावरून वाचक बनण्यास इच्छुक असलेले जिज्ञासू  SanatanPrabhat.Org/Subscribe/ या संकेतस्थळावरून वर्गणीदार होऊ शकतात. या ऑनलाईन सुविधेचा लाभ घेण्यासाठी त्यांना उद्युक्त करावे. ऑनलाईन वर्गणीदार अर्ज भरणे शक्य नसल्यास स्थानिक साधकांनी त्यांना संपर्क करावा. ही सुविधा दैनिक वगळून अन्य नियतकालिकांसाठी आहे.


Multi Language |Offline reading | PDF