पाक सरकारमध्ये २ दशकांनंतर हिंदु मंत्री

 पाकमध्ये हिंदु मंत्री झाले, तरी त्यांना हिंदूंसाठी काही करता येण्याची शक्यता अल्पच आहे ! 

इस्लामाबाद – पाकचे नवे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांच्या मंत्रीमंडळाचा ४ ऑगस्टला शपथविधी झाला. अब्बासी यांच्या कॅबिनेटमध्ये ६५ वर्षीय हिंदू खासदार डॉ. दर्शन लाल यांचाही समावेश करण्यात आला आहे. गेल्या २ दशकांनंतर पाकच्या सरकारमध्ये पहिल्यांदाच एका हिंदु खासदाराचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला आहे. दर्शन लाल यांना पाकच्या ४ प्रांतांचे समन्वयक म्हणून नेमण्यात आले आहे. दर्शन लाल सिंध प्रांतातील मीरपूर येथे प्रॅक्टीस करत आहेत. वर्ष २०१३ मध्ये ते पीएम्एल्-एन् पक्षाच्या तिकीटावर अल्पसंख्याकांसाठी राखीव जागेवर निवडून आले होते.


Multi Language |Offline reading | PDF