सोपोरमध्ये लष्कर-ए-तोयबाचे ३ आतंकवादी ठार

सोपोर – काश्मीरमधील सोपोर येथे सुरक्षादलासमवेत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे ३ आतंकवादी ठार झाले. या चकमकीनंतर बारामुल्ला भागातील इंटरनेट सेवा त्वरित बंद करण्यात आली आहे. या चकमकीत एक सैनिक घायाळ झाल्याचेही सांगण्यात येते. सोपोर येथील सर्व शासकीय कार्यालयांना आणि शाळांना ५ ऑगस्ट या दिवशी सुट्टी देण्यात आली. काश्मीरच्या खोऱ्यांत या वर्षी आतापर्यंत १२० हून अधिक आतंकवाद्यांना ठार करण्यात आले आहे.


Multi Language |Offline reading | PDF