पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनच्या साहाय्याने ६ धरणांची निर्मिती करणार

  • भारतातून पाकमध्ये वहाणार्‍या नद्यांवर भारताने धरणे बांधल्यास पाक त्याला विरोध करतो त्यामुळे आपण ते बांधत नाही. दुसरीकडे त्याच नद्यांवर पाक धरणे बांधतो, याचा सरकारने विचार करायला हवा !
  • पाकने बांधलेली धरणे उद्ध्वस्त करण्याचे साहस भारत दाखवणार का ? 

नवी देहली – पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनच्या साहाय्याने सिंधू नदीवर ६ धरणे बांधणार आहे, अशी माहिती केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांनी राज्यसभेत दिली.

सिंह म्हणाले की, पाकची ही कृती म्हणजे भारताच्या सार्वभौमत्व आणि क्षेत्रीय अखंडतेचे उल्लंघन आहे. पाकने अवैधरित्या या क्षेत्रावर नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळेच येथे कोणत्याही परिस्थितीची हालचाल ही भारताच्या सार्वभौमत्वावर घाला घालणारी ठरेल. आम्ही नियमाप्रमाणे पाक आणि चीन या दोघांना आमचा विरोध कळवला आहे.


Multi Language |Offline reading | PDF