कॅसिनो कॅशलेस करण्याविषयी अभ्यास केला जाईल ! – मनोहर पर्रीकर

पणजी, ३ ऑगस्ट (वार्ता.) – गोव्यातील कॅसिनो नोटारहित (कॅशलेस) करता येतील का, याचा अभ्यास केला जाईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर विधानसभेत म्हणाले. विधानसभेत कॅसिनोविषयी झालेल्या चर्चेला उत्तर देतांना मुख्यमंत्री पर्रीकर यांनी ही माहिती दिली.

राज्याची आर्थिक स्थिती स्थिर

राज्यातील आर्थिक स्थिती स्थिर आहे. कर्ज आणि उत्पन्न यांचे प्रमाण नियंत्रणात आहे, असे मनोहर पर्रीकर यांनी विरोधकांकडून होणारा राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचा आरोप फेटाळतांना सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, वीज, शेती, सार्वजनिक खाते आदी सर्व खात्यांची देयके वेळेवर देण्यात आली आहेत. जी देयके प्रलंबित आहेत, ती पुढील २ महिन्यांत देण्यात येतील.


Multi Language |Offline reading | PDF