गोवा मांस प्रकल्पात हत्येसाठी अन्य राज्यांतून प्राणी आणण्यास बंधन नाही ! – मुख्यमंत्री

पणजी, ३ ऑगस्ट (वार्ता.) – उसगाव येथील गोवा मांस प्रकल्पात हत्येसाठी अन्य राज्यांतून प्राणी आणण्यास कोणतेही बंधन नाही, असे लेखी उत्तर मुख्यमंत्री, तथा पशूसंवर्धन खात्याचे मंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत दिले आहे.

काँग्रेसचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला दिलेल्या लेखी उत्तरात मंत्री पर्रीकर यांनी म्हटले आहे की, गोवा मांस प्रकल्पात एका पशूचिकित्सकाची नेमणूक करण्यात आली आहे. या मांस प्रकल्पात हत्येसाठी अन्य राज्यांतून आणण्यात येत असलेल्या पशूंच्या संख्येवर नियंत्रण आणण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही.


Multi Language |Offline reading | PDF