आम आदमी पक्ष विधानसभा पोटनिवडणूक लढवणार नाही !

पणजी, ३ ऑगस्ट (वार्ता.) – आम आदमी पक्ष पणजी आणि वाळपई मतदारसंघात होणारी विधानसभा निवडणूक लढवणार नाही. निधर्मी मतांमध्ये विभागणी होऊ नये आणि सरळसरळ भाजप अन् अन्य एका प्रबळ उमेदवारांमध्ये लढत व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आपचे नेते वाल्मीकि नायक यांनी दिली. यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपने गोव्यातील सर्व ४० मतदारसंघात निवडणूक लढवली होती आणि सर्व ठिकाणी आपचे उमेदवार पराभूत झाले होते.


Multi Language |Offline reading | PDF