पाकने वापर करून घेतल्याची आतंकवादी अबू दुजानाला जाणीव ! – सैन्यासमवेतच्या संभाषणातून माहिती उघड

श्रीनगर – लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू दुजाना याला काही दिवसांपूर्वी सैन्याने ठार केले. तत्पूर्वी सैन्याधिकार्‍यांनी त्याला आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले होते. पाकिस्तान तुझा वापर करत आहे, असेही त्याला सांगण्यात आले. त्या वेळी त्याने मान्य केले की, पाकने त्याचा वापर केला. तसेच त्याने आत्मसमर्पण केले, तर पाकिस्तान त्यांच्या कुटुबियांना ठार करील, असेही त्याने सांगितले. त्याचे कुटुंबीय पाकमध्ये रहातात. सैन्याधिकार्‍यांनी एका काश्मिरी नागरिकाच्या साहाय्याने अबू दुजानाशी दूरभाषवरून संवाद साधला होता.

पाक सरकारचे अधिकृत संकेतस्थळ हॅक करून भारताचे राष्ट्रगीत आणि स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा पोस्ट

इस्लामाबाद – पाकिस्तान सरकारचे अधिकृत संकेतस्थळ अज्ञात हॅकरने हॅक केले आहे. त्यावर भारताचे राष्ट्रगीत आणि भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा पोस्ट करण्यात आल्या आहेत.

मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्याला चीनचा पुन्हा विरोध

नवी देहली – चीनने नकाराधिकाराचा (व्हेटोचा) उपयोग करत मसूद अजहर याला संयुक्त राष्ट्र संघ समितीच्या आंतरराष्ट्रीय आतंकवाद्यांच्या सूचीमध्ये टाकण्याच्या निर्णयावर ३ मासांसाठी तांत्रिक स्थगिती आणली आहे. अमेरिका आणि फ्रान्स यांनी मसूद अजहरला सूचीमध्ये टाकण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. याच वर्षी फेब्रुवारी मासात चीनने मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्र समितीत विरोध केला होता.

चीनने मसूद अजहरविरोधातील प्रस्तावाला केलेल्या तांत्रिक विरोधाचा २ ऑगस्ट हा शेवटचा दिनांक होता. यानंतर जर चीनने पुन्हा एकदा स्थगिती आणण्याचा निर्णय घेतला नसता, तर मसूद अजहरला आपोआप आंतरराष्ट्रीय आतंकवादी म्हणून घोषित करण्यात आले असते.

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांच्या गोळीबारात मेजर आणि सैनिक हुतात्मा

आतंकवाद्यांच्या आक्रमणात सैन्याधिकारी आणि सैनिक यांना वारंवार हुतात्मा होऊ देणारा जगातील एकमेव देश भारत !

शोपियान – काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात ३ ऑगस्टच्या सकाळी सैनिक आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत एक मेजर अन् सैनिक हुतात्मा झाले, तर ३ सैनिक घायाळ झाले. त्यापूर्वी कुलगाम जिल्ह्यात सैनिकांनी २ आतंकवाद्यांना ठार केले. त्यांच्याकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला. ठार झालेल्या आतंकवाद्यांपैकी एकाची ओळख पटली आहे. १ मे या दिवशी काश्मीरमधील एका बँकेच्या एटीएम् व्हॅनवर घालण्यात आलेल्या दरोड्यात त्याचा सहभाग होता. या वेळी ५ पोलीस आणि दोन सुरक्षारक्षक यांना प्राण गमवावे लागले होते.


Multi Language |Offline reading | PDF