गोहत्या आणि गोरक्षण 

पोलीस गोहत्या रोखत नाहीत; उलट गोरक्षकांनाच लक्ष करतात, असे गेली अनेक वर्षे सर्वत्र चालू आहे. गोरक्षक गोहत्या रोखण्याचा प्रयत्न करतात. गोहत्यार्‍यांना रोखण्यासाठी गोरक्षक जिवावर उदार होऊन प्रयत्न करतात. तरीही त्यांनाच आक्रमणकर्ते ठरवले जाऊन सध्या गोरक्षक हा चर्चेचा विषय झाला आहे. गाय ही इतर पशूंसारखी पशू असल्याने तिची हत्या करण्यात काहीच वावगे नाही. तसेच गोमांस खाणारे लोक या देशात असल्याने आणि काही पंथीय लोकांचा तो व्यवसाय असल्याने तिची हत्या करण्यास विरोध करणे, हे इतरांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यासारखे आहे, असे काहींना वाटते.

गाय वनात चरतांना चार्‍यासह औषधी वनस्पती चरते. त्या औषधी वनस्पतींचे सर्व गुण दूध, गोमूत्र आणि गोमय यांत उतरतात. ज्या ठिकाणी गायीचे गोमूत्र सतत झिरपत असते, त्या भूमीखाली पाण्याची पातळी वर येते, असा अनेकांचा अनुभव आहे. गायीचे दूध, गोमूत्र, शेण, तूप, दही यांपासून बनवलेल्या पदार्थांत औषधी गुण असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे.

विदेशी गायीच्या दुधाला ए-१ प्रकारचे दूध आणि भारतीय गायीच्या दुधाला ए-२ प्रकारचे दूध म्हणतात. गायीच्या दुधात तेजतत्त्व सर्वाधिक आणि पृथ्वीतत्त्व अल्प प्रमाणात असल्याने ते पिणारी व्यक्ती प्रतिभासंपन्न होते. तिची स्मरणशक्ती आणि आकलनक्षमता वृद्धिंगत होण्यास साहाय्य होते. देशी गायीचे आभामंडल सामान्य मनुष्य आणि अन्य पशूंच्या आभामंडलाहून अधिक व्यापक असते. हेच कारण आहे की, गायीची प्रदक्षिणा केल्याने घनात्मक ऊर्जा मिळते. गायीमुळे भूमातेचे शुद्धीकरण होते.

भारतातून २५ सहस्र गायी बांगलादेशांतील पशूवधगृहात पाठवल्या जातात. भारतातील पशूवधगृहांत प्रतिदिन ५० सहस्र गायींची कत्तल केली जाते. देशात प्रतिमास दोन ते तीन लक्ष इतक्या गोवंशाची कत्तल होत असून केरळमध्ये २५ सहस्र गोवंशाची कत्तल प्रतिमास होते. आज भारत मांस निर्यात करणारा एक प्रमुख देश बनला असून गोशाळांपेक्षा पशूवधगृहांना अधिक अनुदान दिले जाते. सरकारच्या या धोरणामुळेच स्वातंत्र्याच्या वेळी १२८ प्रजाती असलेले ९० कोटी गोधन आज १ कोटी इतकेच राहिले आहे. शासकीय अभ्यासातील आकडेवारीनुसार गेल्या १० वर्षांत २ लक्ष ५६ सहस्र शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. याच अभ्यासामध्ये जे शेतकरी भारतीय गाय पाळत होते, त्यांनी आत्महत्या केलेल्या नाहीत, असाही निष्कर्ष आहे. शासन चहाला राष्ट्रीय पेय घोषित करते; परंतु दूधाला करत नाही; कारण शासनाला गायींचे रक्षण करावे लागेल. गायींचे अनन्य उपयोग आणि महात्म्य असूनही नतद्रष्ट माणसे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी, आर्थिक लाभासाठी आणि बहुसंख्यांक हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवत गायीस लक्ष्य करतात. गायीसाठी सिंहाला स्वत:चे प्राण देणार्‍या राजा दिलीपच्या भारतभूमीचे हे दुर्दैव नव्हे का ?

– श्री. सुनील लोंढे, नवी मुंबई


Multi Language |Offline reading | PDF