काश्मीर खोर्‍यातील मुसलमानांच्या जन्मदरात वाढ !

समाजनीती समीक्षण केंद्राचा अहवाल

काश्मीरचे इस्लामीकरण

नवी देहली : वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार प्रकाशित करण्यात आलेल्या जननक्षमता सूचीमध्ये दर्शवण्यात आले आहे की,वर्ष २००१ च्या जनगणनेच्या पार्श्‍वभूमीवर काश्मीर खोर्‍यातील वार्षिक जन्मदर दुप्पट झाला आहे. वर्ष २०११ च्या जनगणनेच्या आधीच्या वर्षी काश्मीर खोर्‍यात ८५ सहस्र १५७ मुलांचा जन्म झाला होता, वर्ष २०११ मध्ये ही संख्या वाढून १ लक्ष ७६ सहस्र ६७३ एवढी झाली. ही वाढ केवळ खोर्‍यामधील आहे. येथे १० वर्षांत जन्मलेल्या मुलांमध्ये ९१ टक्के मुसलमान मुले आहेत. समाजनीती समीक्षण केंद्राचे डॉ. जे.के. बजाज यांनी सिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

१. हिंदू बहुसंख्य असलेल्या जम्मू विभागात हीच संख्या केवळ १९.३ टक्क्यांनी वाढली आहे. लडाखमध्ये जन्मदराच्या संख्येत एक तृतियांशाने घट झाली आहे.

२. काश्मीर खोर्‍यातील मुसलमान महिला वर्ष २००१ च्या तुलनेत आता ११ टक्क्यांहून अधिक मुले जन्माला घालतात.

३. वर्ष २००१ च्या जनगणनेनुसार काश्मीरमध्ये प्रत्येक १०० लोकसंख्येमागे १४ मुले होती, वर्ष २०११ मध्ये हे प्रमाण १७ मुले इतके झाले.

४. अधिक मुले व्हावीत, यासाठी काश्मीर खोर्‍यातील मुसलमान एक पूर्वनियोजित, एकत्रित आणि यशस्वी प्रयत्न करत आहेत, हेही सदर आकडेवारी दर्शवते.

 

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now