‘त्या’ नेत्यांविषयी आक्षेपार्ह मजूकर काढण्याविषयी सर्व सदस्यांच्या भावना शिक्षण मंडळाला कळवू ! – शिक्षणमंत्री विनोद तावडे

९ वीच्या इतिहासाच्या पुस्तकातील इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यावरील लिखाणाचे प्रकरण

स्वनेत्यांचा खरा इतिहास आणि सत्याला घाबरणारे काँग्रेसवाले !

मुंबई, २ ऑगस्ट (वार्ता.) – दिवंगत इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यावर ९ वीच्या इतिहासाच्या पुस्तकात घेतलेल्या धड्यामध्ये कोणतेही आरोप केलेले नाहीत. त्या पुस्तकात वर्ष १९४७ पासून २००० पर्यंतचा महत्त्वाचा इतिहास घेतलेला आहे. त्या पुढचा इतिहास घेतलेला नाही. त्या दोन्ही नेत्यांनी केलेल्या चांगल्या कामांचाही उल्लेख त्यात करण्यात आला आहे. असे असतांना सध्याचे शासन जाणीवपूर्वक चुकीच्या गोष्टी दाखवत आहेत, असे सांगण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्या नेत्यांविषयी आक्षेपार्ह लिखाण काढण्याविषयी सर्व सदस्यांच्या भावना शिक्षण मंडळाला पत्राद्वारे कळवू. शिक्षण मंडळ ही एक स्वायत्त संस्था असून शासन त्यात हस्तक्षेप करू शकत नाही, असे उत्तर शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले. विधानसभेचे २ ऑगस्टचे कामकाज चालू होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आमदार अजित पवार यांनी नियम ५७ अन्वये प्रश्नोत्तराचा तास बाजूला ठेवून वरील विषयावर चर्चा करणे आणि ते दोन्ही आक्षेपार्ह धडे तात्काळ वगळण्याविषयी आदेश शासनाने द्यावेत, अशी मागणी केली होती.


Multi Language |Offline reading | PDF