धवडकी येथील दत्तमंदिरातील ३ समयांची चोरी

सावंतवाडी – तालुक्यातील धवडकी येथील श्री दत्तमंदिरातील २५ सहस्र रुपये किमतीच्या ३ समया चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी देवस्थान समितीच्या पदाधिकार्‍यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

३१ जुलै या दिवशी रात्री अज्ञात चोरांनी अंधाराचा लाभ उठवत धवडकी येथील दत्तमंदिरातील ३ समया चोरल्या. दुसर्‍या दिवशी सकाळी देवस्थानचे अध्यक्ष श्री. सूर्यकांत पानोळकर पूजा करण्यासाठी मंदिरात गेले असता ही घटना त्यांच्या लक्षात आली. गेल्या वर्षी ऑगस्ट मासातच मंदिरातील फंडपेटी चोरीला गेली होती. तिचा अजूनही तपास लागलेला नाही.


Multi Language |Offline reading | PDF