समुद्रकिनार्‍यांवर मद्यप्राशन करणार्‍यांना प्रसंगी अटक करू ! – पर्यटनमंत्री आजगावकर

समाजहित लक्षात घेऊन शासनाने सार्वत्रिक मद्यबंदीच लागू करणे आवश्यक आहे !

पणजी, २ ऑगस्ट (वार्ता.) – समुद्रकिनार्‍यांवर मद्यप्राशन करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे आणि आवश्यकता भासल्यास त्यांना अटकही केली जाणार आहे, अशी चेतावणी पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी दिली आहे. पर्यटनमंत्री आजगावकर यांनी गोवा विधानसभेत १ ऑगस्ट या दिवशी आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी विचारलेल्या एका प्रश्‍नाला उत्तरादाखल दिली.

मंत्री आजगावकर पुढे म्हणाले, समुद्रकिनारे स्वच्छ असले पाहिजेत आणि त्याठिकाणी कोणतेच गैरप्रकार चालू नयेत. समुद्रकिनार्‍यांवर मद्यप्राशन करणे बंद करण्यात आले आहे. सुमद्रकिनार्‍यावर मद्यप्राशन करणार्‍यांवर यापूर्वी गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. शासन टुरिस्ट ट्रेड अ‍ॅक्टमध्ये पालट करून हा कायदा अधिक कठोर करणार आहे. समुद्रकिनार्‍यावर अमली पदार्थांची विक्री होऊ नये, यासाठी पर्यटक गार्डना सतर्क रहाण्यास सांगण्यात आले आहे.

शासन कोणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now