कळसा-भंडुरा प्रकल्प म्हणजे पर्यावरण टाइमबॉम्ब ! – मुख्यमंत्री पर्रीकर

पणजी – कर्नाटक शासनाचा कळसा-भंडुरा प्रकल्प पर्यावरणाला अतिशय घातक आहे. हा प्रकल्प म्हणजे एक पर्यावरण टाइमबॉम्ब आहे, असे उद्गार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काढले. गोवा विधानसभेत शून्य तासाच्या वेळी मुख्यमंत्री पर्रीकर यांनी हे उद्गार काढले.

मुख्यमंत्री पर्रीकर पुढे म्हणाले, कर्नाटकने म्हादईचे पाणी वळवल्यास त्याचा गोव्यावर विपरीत परिणाम होणार आहे. यामुळे अभयारण्यातील प्राणीमात्रांवर, तसेच पश्‍चिम घाटातील नैसर्गिक संपदेवर विपरीत होणार आहेत. कर्नाटक शासन लवादासमोर सत्यस्थिती सांगत नाही. कर्नाटक शासनाचे त्यांच्या राज्याच्या सीमेवरील सर्व राज्यांशी पाणी वाटपावरून तंटे चालू आहेत. अरबी समुद्र एकच अपवाद आहे.


Multi Language |Offline reading | PDF