गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करणार ! – मंत्री सुदिन ढवळीकर

पणजी, २ ऑगस्ट (वार्ता.) – गोव्यातील रस्ते गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त होणार, असे आश्‍वासन सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी गोवा विधानसभेत दिले. मंत्री ढवळीकर पुढे म्हणाले की, राज्यात वारंवार विविध निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू होत असल्याने काम करण्यास अडथळा येत आहे. सध्या पणजी आणि वाळपई पोटनिवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खाते सर्व प्रलंबित कामे पूर्ण करणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF