वाहतुकीस अडथळा ठरल्याच्या कारणावरून संभाजीनगर येथे प्रशासनाने श्री दुर्गादेवीचे मंदिर पाडले

संभाजीनगर – उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिकेने केलेल्या कारवाईत येथील ४० वर्षे जुने असलेले अनधिकृत श्री दुर्गादेवीचे मंदिर पाडण्यात आले. (अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांच्या संदर्भात प्रशासन अशीच तत्परता दाखवणार का ? – संपादक) तत्पूर्वी स्थानिक महिलांनी देवीची पूजा केली. मंदिर पाडल्यामुळे येथील महिलांना रडू आले. अनेक धार्मिक स्थळे नियमानुकूल होण्याची शक्यता असतांना त्यांवर कारवाई करण्याची महापालिकेकडून घाई केली जात आहे.


Multi Language |Offline reading | PDF