गुजरातमधील काँग्रेसच्या आमदारांना ठेवण्यात आलेल्या बेंगळुरूमधील रिसॉर्टवर आयकर खात्याची धाड

बेंगळुरू – पक्षातून फुटून जाऊ नयेत म्हणून गुजरातमधील काँग्रेसच्या ४४ आमदारांना बेंगळुरू येथील इगलटोन या रिसॉर्टवर ठेवण्यात आले आहे. या रिसॉर्टवर आयकर खात्याने २ ऑगस्टच्या दिवशी धाड घातली. हे रिसॉर्ट कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील मंत्री डी.के. शिवकुमार यांच्या मालकीचे आहे. तसेच शिवकुमार यांच्या देहलीतील घरावर धाड घालून ५ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. गुजरातमध्ये काँग्रेसच्या ६ आमदारांनी त्यागपत्र दिले आहे. त्यातील तिघांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या धाडीनंतर संसदेत काँग्रेसकडून सरकारवर टीका करण्यात आली.


Multi Language |Offline reading | PDF