फरिदाबाद (हरियाणा) येथे राष्ट्रध्वजाचा अनादर रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन

निवेदन वाचतांना जिल्हा शिक्षणाधिकारी श्रीमतीमनोज कौशिक (उजवीकडे) आणि सौ. संदीप कौर

फरिदाबाद (हरियाणा) – प्रतिवर्षी १५ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. तो रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून फरिदाबादच्या जिल्हा शिक्षणाधिकारी श्रीमती मनोज कौशिक यांना निवेदन देण्यात आले. या संदर्भात लवकरच आदेश काढून सर्व सरकारी कार्यालये आणि खाजगी विद्यालये यांना तो पाठवण्यात येईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले. समितीच्या सौ. संदीप कौर यांनी निवेदन दिले.

सेक्टर १६ मधील न्यू विद्या मंदिरचे संचालक श्री. जी.आर्. शर्मा यांनाही या संदर्भात निवेदन देण्यात आले. त्यांनीही सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांना याविषयी माहिती देण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. तुम्ही देशहितासाठी चांगले काम करत आहात, असे श्री. शर्मा म्हणाले. तसेच त्यांनी या संदर्भात विद्यालयामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now