फुटीरतावाद्यांकडे असलेली पोलिसांची मोस्ट वॉन्टेड आतंकवाद्यांची सूची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून जप्त

जम्मू-काश्मीर पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्‍नचिन्ह !

असे पोलीस जम्मू-काश्मीरमध्ये असल्यावर तेथील आतंकवाद कधीतरी संपू शकतो का ? आता संपूर्ण अधिकार सैन्यालाच द्या !

श्रीनगर – राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एन्आयएने) शाहीद-उल्-इस्लाम या जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्याकडून मोस्ट वॉन्टेड आतंकवाद्यांची सूची जप्त केली आहे. आतंकवादी कारवायांसाठी निधी पुरवत असल्याच्या आरोपाखाली एन्आयएच्या पथकाने इस्लामला यापूर्वीच अटक केली आहे. पोलिसांनी सिद्ध केलेली सूची फुटीरतावादी नेत्याकडे मिळाल्यामुळे पोलिसांवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

एन्आयएच्या माहितीनुसार जम्मू-काश्मीर पोलिसांच्या गुप्तचर विभागाने ३ मासांपूर्वी मोस्ट वॉन्टेड आतंकवाद्यांची सूची सिद्ध केली होती. काश्मीरमध्ये सक्रीय असणार्‍या १५८ आतंकवाद्यांचा यात उल्लेख आहे. या सूचीत या आतंकवाद्यांविषयी महत्त्वाची माहितीही दिली आहे. ही सूची तुम्ही सिद्ध केली आहे का ? तसेच ती पाकपर्यंत पोहोचली आहे का,  असे प्रश्‍नही एन्आयएने जम्मू-काश्मीर पोलिसांना विचारले आहेत. जम्मू-काश्मीरमधील काही कुटुंबांमध्ये एक मुलगा आतंकवादी, तर दुसरा पोलीस विभागात कार्यरत आहे. त्यामुळे अनेक गोष्टींची माहिती फुटण्याची शक्यता असते, असे पोलीस अधीक्षकांनी एन्आयएला सांगितले. (अशी स्थिती आहे, तर कुटुंबातील पोलीस त्याच्या आतंकवादी नातेवाईकाला पोलीस विभागाच्या स्वाधीन का करत नाही ? अशा पोलिसांवर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now