सातारा येथे गुन्हेगाराचा पाठलाग करणार्‍या फलटण ग्रामीण पोलिसांवर झालेल्या गोळीबारात ३ पोलीस घायाळ

स्वतःचे संरक्षण करू न शकणारे पोलीस सामान्यांना संरक्षण काय देणार ? ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

सातारा – खून, दरोडा आणि घरफोडी करणार्‍या गुन्हेगाराचा पाठलाग करणार्‍या फलटण ग्रामीण पोलिसांवर गुन्हेगाराच्या नातेवाइकांनी केलेल्या आक्रमणात ३ पोलीस घायाळ झाले. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दरोडेखोर घायाळ झाला; मात्र तो त्याच स्थितीत पळून गेला.

या वेळी नातेवाइकांनी तलवार, कोयता आणि दांडुका यांनी आक्रमण केले. (असे पोलीस आतंकवाद्यांशी काय लढणार ? पोलिसांवर वारंवार होणारी आक्रमणे देशासाठी लज्जास्पद नव्हे का ? – संपादक) पोलीस हवालदार जगदाळे यांच्या डाव्या बाजूला पाठीवर कोयत्याचा घाव बसल्याने ते गंभीर घायाळ झाले आहेत. पोलिसांच्या गाडीचीही दगड आणि दांडुका यांनी मोडतोड करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया चालू आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now