लोकांना लाज वाटण्यासारखे विज्ञापन शासन का देते ? – काँग्रेसचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा

कदंबच्या बसवर महिलांची छायाचित्रे असलेले गर्भनिरोधकांचे विज्ञापनफलक लावल्याचे विधानसभेत पडसाद

अशाही गोष्टी आता सरकारला सांगाव्या लागणार का ?

पणजी, १ ऑगस्ट (वार्ता.) – कदंब महामंडळाच्या बसगाड्यांवर गर्भनिरोधकांचे विज्ञापनफलक लावण्यात आले आहेत. या बसेस राज्यात सर्वत्र फिरतात. हे विज्ञापन मुले पहातात. हे विज्ञापन पाहून लोकांना लाज वाटते. अशी विज्ञापने शासन का देते, असा प्रश्‍न काँग्रेसचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी गोवा विधानसभेत १ ऑगस्ट या दिवशी माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या अनुदानित मागण्यांवर चर्चा करतांना केला. (कदंब महामंडळाच्या बस, तसेच इतर सार्वजनिक ठिकाणांवरील महिलांची छायाचित्रे असलेले गर्भनिरोधकांच्या विज्ञापनफलकांच्या विरोधात रणरागिणी शाखेने आंदोलन छेडले होते आणि याचे फलित म्हणून प्रत्येक बसवरील दोन्ही बाजूंचे विज्ञापन हटवण्यात आले होते ! – संपादक)

आमदार सिल्वेरा पुढे म्हणाले, शासन विज्ञापनांवर पुष्कळ पैसे खर्च करत असते. कदंब महामंडळाच्या बसगाड्यांवरील विज्ञापनात सनी लियोन यांचे छायाचित्र आहे. गर्भनिरोधकाचा वापर करा, असा सल्ला या विज्ञापनातून दिला गेला आहे. हा शब्द विधानसभेत उच्चारणे योग्य आहे का, हे मला माहीत नाही. या विज्ञापनातून काय साध्य होते ? (सरकारला याविषयी खडे बोल सुनावणारे आमदार सिल्वेरा यांचे अभिनंदन ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now