पू. मेनरायकाकांच्या वाढदिवसानिमित्त प्रथमच शुद्ध हिंदीतून कविता सुचणे आणि ती कविता वाचून पू. काकांची भावजागृती होणे

हे ईश्‍वरा, मला पू. मेनरायकाकांचा वाढदिवस असल्याचे कळले. तेव्हा मला संकल्पना सुचली नव्हती. पू. काका इतक्या आजारपणातही आम्हा साधकांचे त्रास अल्प व्हावेत; म्हणून आमच्यासाठी घंटोन्घंटे बसून नामजप करतात. त्यांच्याप्रती शुभेच्छापत्राच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि त्यांच्याकडून आशीर्वाद मिळवण्याची संधी सोडायला नको; म्हणून हातात जी लग्नपत्रिका आली, त्यावर वरील कविता माझ्याकडून प्रथमच हिंदीतून आपोआप लिहिली गेली. मी कधीच हिंदीतून कविता केलेली नाही. ही कविता शुद्ध हिंदीत आणि शुद्धलेखनासहित आपोआप लिहिली गेली. मी हिंदी भाषांतर करणार्‍या एका साधकाकडून पडताळून घेतल्यानंतर त्याने ती योग्य असल्याचे सांगितले. मी कधीच हिंदीतून बोलत नाही कि लिहित नाही; पण पू. मेनरायकाका-काकू यांना हिंदी भाषा बोलता आणि लिहिता-वाचता येते. त्यांना त्याच भाषेतील कविता लिहून दिल्यास त्यांना त्यातला आनंद घेता येईल, यासाठी तूच मला हिंदीतून कविता सुचवून ती शुद्ध हिंदीत लिहून घेतलीस. पू. काकांना ही कविता वाचून दाखवली. तेव्हा त्यांची पुष्कळ भावजागृती झाली. ते म्हणाले,मी प्रत्यक्षात असा नाही. हा केवळ तुमचा भाव आहे. ईश्‍वरा, सत्य हेच आहे की, पू. काका-काकू वरील कवितेप्रमाणेच आहेत.

हे ईश्‍वरा, मला पू. मेनरायकाकांसाठी शुभेच्छापत्र बनवण्याची संधी दिलीस, त्यासाठी मी तुझ्या चरणी कृतज्ञ आहे.

कु. दीपाली पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.७.२०१७)


Multi Language |Offline reading | PDF