(म्हणे) वर्षातील ३ दिवस कुर्बानी देण्यास अनुमती द्या ! – आमदार अबू आझमी, समाजवादी पक्ष

असे आहे, तर हिंदूंनीही धर्मानुसार गायीचे रक्षण केल्यास चुकीचे काय ?

मुंबई, १ ऑगस्ट (वार्ता.) – गोवंश हत्याबंदी कायद्याच्या नावावर तथाकथित गोरक्षक अल्पसंख्यांकांवर अत्याचार करतात. गोवा, केरळ, कर्नाटक आणि अन्य राज्यांत गोहत्या बंदी नाही. तेथे गोवंश हत्याबंदी का नाही ? आम्ही धर्मानुसार वागणारे असून आम्हाला ३ दिवस कुर्बानी देण्याची अनुमती द्या, असे विखारी प्रतिपादन समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत औचित्याच्या सूत्राद्वारे केले. (गोवंशांची हत्या खर्‍या अर्थी रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच अपरिहार्य ! – संपादक)

आझमी पुढे म्हणाले की, बकरी ईदच्या वेळी अनेक बकर्‍यांची विक्री होते. त्या बकर्‍या आणि जनावरे अन्य राज्यांतून महाराष्ट्रात आणल्या जातात. त्यावेळी त्या गोरक्षकांकडून पैसे घेणे, पोलिसांना खोटे गुन्हे प्रविष्ट करण्यास भाग पाडणे, असे आणि अन्य प्रकार घडत असतात. त्याद्वारे ते अल्पसंख्यांकांना त्रास देतात. गाडीमधून अनेक जनावरे नेत असतांना ती कोंबून न्यावी लागतात. जसे कारागृहात ठराविक संख्येपेक्षा अनेक कैद्यांना ठेवले जाते, तसेच जनावरांची वाहतूक करतांना होते. त्यात चुकीचे काय ? (याचा अर्थ कोणी अयोग्य कृती केली; म्हणून आम्हीही अयोग्य कृती केल्यास चुकीचे काय, अशा मनोवृत्तीचे अबू आझमी ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF