(म्हणे) ‘दोन विभागांचे पुरस्कार एकाच नावाने नसावेत; म्हणून नाव पालटले !’ – अल्पसंख्यांक विभागाची सारवासारव

अल्पसंख्यांक विभागाने संत ज्ञानेश्‍वर पुरस्काराचे नाव पालटल्याचे प्रकरण

मुंबई – अल्पसंख्यांक आणि सांस्कृतिक कार्य या दोन विभागांचे पुरस्कार एकाच नावाने नसावेत, म्हणून कवी मिर्झा गालिब जीवनगौरव पुरस्कार असे नामकरण केले, असा खुलासा अल्पसंख्यांक खात्याच्या वतीने माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या उपसंचालक (वृत्त) यांनी केला आहे.

या खुलाशात म्हटले आहे की, ऊर्दू भाषेतून देण्यात येणारा पुरस्कार हा ऊर्दू साहित्य क्षेत्रात मिर्झा गालिब यांचे योगदान पहाता त्या क्षेत्रातील महनीय व्यक्तींच्या नावाने देण्याच्या उद्देशानेच त्यांच्या नावाने देण्यात येणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF