एखाद्याने वन्दे मातरम् म्हटले नाही, तर काय बिघडणार आहे ?

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा राष्ट्रद्रोही प्रश्‍न

अशा मानसिकतेचे नेते जनतेमध्ये राष्ट्रप्रेम काय रुजवणार ?

ठाणे – दोन समाजांत तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘वन्दे मातरम्’चे सूत्र जाणीवपूर्वक काढले जात आहे. वन्दे मातरम् प्रत्येकाने म्हटलेच पाहिजे; पण जर एखाद्याने वन्दे मातरम् म्हटले नाही, तर काय बिघडणार आहे ? असा प्रश्‍न केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारिप नेते रामदास आठवले यांनी केला आहे. महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या ११ व्या वर्धापनदिनानिमित्त स.है. जोंधळे सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या वेळी रामदास आठवले बोलत होते.

या वेळी आठवले पुढे म्हणाले की, देशात बहुसंख्य समाज गुण्यागोविंदाने रहात आहे. (रामदास आठवले स्वप्नात वावरत आहेत का, असा प्रश्‍न जनतेला पडल्यावाचून रहाणार नाही. प्रत्येक राज्यातील धर्मांध आज आतंकवाद्यांना मिळाले आहेत, प्रत्येक राज्यात छोटे पाकिस्तान निर्माण झाले आहेत, प्रत्येक राज्यात धर्मांध हे हिंदूंवर आक्रमणे करत आहेत, हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे, लव्ह जिहादच्या घटना घडत आहेत. असे असतांना बहुसंख्य समाज गुण्यागोविंदाने रहात आहे, असे म्हणणे हास्यास्पद नव्हे का ? – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now