मुंब्रा येथील काँग्रेसच्या नगरसेवकाकडून ठाणे महापालिकेच्या अभियंत्याला मारहाण

यसीन कुरेशी

ठाणे, १ ऑगस्ट (वार्ता.) – मुंब्रा येथील काँग्रेसचे नगरसेवक यसीन कुरेशी यांनी ठाणे महापालिकेचे कार्यकारी अभियंता श्री. धनंजय गोसावी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या समोरील करिमा बाग ही अतिधोकादायक इमारत तोडण्यासाठी महापालिकेचे पथक गेले असता हा प्रकार घडला. (अल्पसंख्यांक म्हणवणार्‍या धर्मांधांचे गुन्हेगारीत प्रमाण अधिक ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF