पुणे येथे धर्मशिक्षणाची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन

पुणे, १ ऑगस्ट (वार्ता.) – गुरुवार पेठेतील तळई वस्ती येथे २७ जुलै या दिवशी रणरागिणी शाखेच्या वतीने महिलांची सद्यस्थिती, तसेच स्वसंरक्षण प्रशिक्षण आणि धर्मशिक्षण यांची आवश्यकता या विषयावर प्रवचन घेण्यात आले. रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी वरील विषयांच्या जोडीलाच नामस्मरणाचे महत्त्वही विशद केले. या वेळी ४० महिला उपस्थित होत्या. त्यांनी या परिसरात नियमित धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली, तसेच गणेशोत्सवाच्या वेळी स्थानिक गणेशोत्सव मंडळांमध्ये स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके आयोजित करण्याचीही सिद्धता दर्शवली.


Multi Language |Offline reading | PDF