हे परमेश्‍वरा, हे गुरुदेवा, उपस्थितीने तुमच्या झालो आम्ही कृतज्ञ ।

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त…

हे परमेश्‍वरा, हे गुरुदेवा,

उपस्थितीने तुमच्या झालो आम्ही कृतज्ञ ।

इथे (पृथ्वीतलावर) आल्याबद्दल

अन् आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल ॥ १ ॥

हे परमेश्‍वरा, हे गुरुदेवा, तुमच्या अनंत प्रीतीसाठी आहेे कृतज्ञ ।

हे परात्पर गुरुदेवा, तुमच्या जन्मदिनी

गाते मी भावाचे भजन ॥ २ ॥

हे परमेश्‍वरा, हे गुरुदेवा, राहिलात तुम्ही आमुच्या समीप ।

म्हणून आहे मी नतमस्तक तुमच्या चरणी ।

प्रीती अन् भक्तीने तुम्हा वाहते मी भावसुमनांजली ॥ ३ ॥

तुमच्याच कृपेने झालो आम्ही उत्सवात सामिल ।

तुमच्याच प्रीतीमुळे आलो तुमच्या जवळ ।

साजरा करण्या तुमचा अमृत महोत्सव ॥ ४ ॥

सौभाग्य लाभले तुमच्या दर्शनाचे, जाहलो आम्ही कृतज्ञ ।

राहू तुमच्या चरणी आम्ही सदैव नतमस्तक ।

तुमच्या जन्मदिनी व्यक्त करते कृतज्ञता तुमच्या चरणी ॥ ५ ॥

– श्रीमती डायना, व्हेनेझुएला (१६.५.२०१७)


Multi Language |Offline reading | PDF