पोलिसांकडून नक्षलवाद्यांची २ स्मारके उद्ध्वस्त !

नक्षलवाद कायमचा संपवण्यासाठी उपाययोजना कधी काढणार ?

गडचिरोली – पोलिसांनी जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात शोध अभियान चालू केले आहे. त्या अंतर्गत नक्षलवाद्यांची २ स्मारके उद्ध्वस्त केली आहेत. ३१ जुलैला एटापल्ली बोलेपल्ली मार्गावर पोलिसांनी नक्षल्यांचे आढळलेले फलकही कह्यात घेतले.

प्रतिवर्षी २८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत नक्षल्यांकडून शहीद सप्ताह साजरा करण्यात येतो. या वेळी कारवाईत ठार झालेल्या नक्षलवाद्यांना श्रद्धांजली देण्यासाठी दुर्गम भागात स्मारके उभी केली जातात.  नक्षलवाद्यांकडून जिल्ह्यातील गरीब जनतेवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करण्यात येत आहेत. इतकेच नाही, तर आदिवासी आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी पोलिसांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र दर्शन सहलीला नक्षलवाद्यांनी विरोध करून विद्यार्थ्यांना सहलीला न पाठवण्याची धमकी दिली आहे; मात्र नक्षलवाद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस विभाग सक्षम असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना शहरात जाण्यासाठी विरोध करणाऱ्यां नक्षली नेत्यांची मुले मात्र शहरात उच्च शिक्षण घेत आहेत. याची जिल्ह्यातील सामान्य जनतेला जाणीव झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आता नक्षलवाद्यांना विरोध करण्यास आरंभ केला आहे, असे त्यांनी सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF