महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्रातील कट प्रॅक्टिस आता लाच घेण्याच्या कक्षेत येणार

हे यापूर्वीच का केले नाही ? भ्रष्टाचार न होणारे एकतरी क्षेत्र आहे का ? भारतातील सर्व क्षेत्रांतील भ्रष्टाचार संपण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

मुंबई – वैद्यकीय क्षेत्रातील कट प्रॅक्टिस आता लाच घेण्याच्या कक्षेत येणार आहे.  त्यासंदर्भात कायदा बनवण्यासाठी राज्य सरकारने एका समितीची स्थापना केली आहे. कट प्रॅक्टिसविरोधी कायद्याचा मसुदा सिद्ध करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने दोन मासांत कायद्याचा मसुदा सिद्ध करून द्यावा, असा आदेश राज्य सरकारने दिला आहे. कायदेविषयक माहितीसाठी सदस्यांना या क्षेत्रातील तज्ञांचे साहाय्य घेण्याची मुभा देण्यात आलेली आहे. कट प्रॅक्टिसविरोधी कायद्यान्वये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला विशेष अधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कट प्रॅक्टिस म्हणजे काय ?

रुग्णाला विशिष्ट लॅबमधून चाचण्या करून घेण्यास सांगण्यासाठी पैसे घेणे, रुग्णाला विशिष्ट रुग्णालयात जाण्यास सांगून त्या रुग्णालयातून पैसे घेणे, रुग्णाला विशिष्ट औषधाच्या दुकानातून औषधे घेण्यास सांगून त्या दुकानदाराकडून कमिशन घेणे, औषध आस्थापनाच्या प्रतिनिधीकडून (एमआरकडून) विशिष्ट औषधे रुग्णाला लिहून देण्याकरिता आणि ती विशिष्ट दुकानातून घेण्यास रुग्णाला सांगण्यासाठी पैसे घेणे, औषध आस्थापनांकडून मिळणाऱ्यां परदेशी सहलीच्या संधी घेणे आदी.


Multi Language |Offline reading | PDF