ऑस्ट्रेलियातील सुखासीन जीवन सोडून साधना करण्यासाठी भारतात आल्यानंतर देवावरील श्रद्धा वाढल्याचे जाणवणे

सौ. रुची गोल्लामुडी

२९ जुलै ते ५ ऑगस्ट २०१७ या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात चालू झालेल्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्यशाळेच्या निमित्ताने…

माझ्या आयुष्यात महत्त्वपूर्ण पालट झाला असल्याने आमच्यासाठी वर्ष २०१६ हे एक वैशिष्ट्यपूर्ण वर्ष होते. दोन वर्षांपूर्वी मी आणि माझे पती श्री. वाम्सी यांनी भारतात परत येण्याचे आणि शक्य झाल्यास रामनाथी (गोवा) येथील आश्रमाजवळ रहाण्याचे ठरवले होते. गुरुकृपेने आम्हाला आश्रमाजवळ एक घर मिळालेे. विदेशातून श्री. वाम्सी नंतर येणार असल्याने मला माझा मुलगा कु. तेज (वय ५ वर्षे) समवेत आधी यावे लागले. मी गोव्यात आल्यावर घरासाठीचे सर्व सोपस्कार पूर्ण केले. घरात मूलभूत साहित्य आणून स्थिरस्थावर झाले. हे सर्व केवळ साधक आणि पू. सिरियाकदादा (एस्.एस्.आर्.एफ्.चे संत) यांच्या साहाय्यामुळे शक्य झाले.

१. मायेच्या कोशातून आणि सुखासीन जीवनातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असे वाटणे

मला मायेच्या कोशातून आणि माझ्या सुखवस्तू जीवनातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असे कुठेतरी वाटत होते. मला कुटुंबीय, मित्र, बाहेर फिरणे, अशा कोणत्याही गोष्टींपासून सुख मिळत नव्हते. मला आतमधे सतत रितेपणा जाणवत होता. असे पुष्कळ दिवसांपासून चालू होते; मात्र साधना करावी कि मायेत रहावे ?, याविषयी मी निश्‍चितपणे निर्णय घेऊ शकत नव्हते. माझा आध्यात्मिक त्रास काही प्रमाणात उणावल्यानंतर आध्यात्मिक नामजपादी उपाय करणे, स्वभावदोष निर्मूलनासाठी प्रयत्न करणे इत्यादी साधनेचे प्रयत्न वाढले.

२. कु. तेज समवेत भारतात येण्याचा निर्णय घेऊन पहिले पाऊल उचलणे आणि भारतात आल्यानंतर साधकांनी केलेल्या साहाय्याच्या माध्यमातून गुुरुमाऊली ९ पावले पुढे येणे

मी कु. तेजसमवेत भारतात येण्याचा निर्णय घेऊन पहिले पाऊल उचलले. माझ्यासाठी श्री. वाम्सी यांच्याविना भारतात परत येणे भावनेच्या स्तरावर अत्यंत कठीण होते; मात्र आध्यात्मिक स्तरावर आणि साधनेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय योग्य होता. मी एक पाऊल उचलले आणि गुरुमाऊली माझ्या साहाय्यासाठी ९ पावले पुढे आली. मागील ३ मासांपासून (महिन्यांपासून) प्रतिदिन मी हा अनुभव साधकांच्या साहाय्यातून घेत आहे. पू. सिरियाकदादाही मला तत्परतेने साहाय्य करतात. मी ईश्‍वराकडे आणखी काय मागणार ? आता मला केवळ त्याची सेवा करायची आहे. मला फार लांबचा पल्ला गाठायचा आहे आणि त्यासाठी तोच (ईश्‍वर) मला घडवणार आहे, यावर माझी पूर्ण श्रद्धा आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये माझी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा वाढली आहे. जीवनातील सर्व गोष्टी नश्‍वर असून केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले शाश्‍वत आहेत. केवळ तेच सत्य आहेत. माझे आयुष्य साधनेसाठीच आहे, याची मला जाणीव झाली आहे.

३. परम पूज्य, परम पूज्य असा जप ऐकू येणे

मी नामस्मरण करतांना माझे मन ॐ नमो भगवते वासुदेवाय । हा जप करतेे; मात्र हृदयापासूनच्या देहाच्या वरच्या भागातून मला प्रत्येक श्‍वासागणिक परम पूज्य, परम पूज्य असा जप ऐकू येतो. मला आध्यात्मिक त्रास होत असतांना असे जाणवत नाही.

– सौ. रुची गोल्लामुडी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१.२०१७)


Multi Language |Offline reading | PDF