अल्पसंख्यांक विकास विभागाने उर्दू अकादमीच्या संत ज्ञानेश्‍वर पुरस्काराचे नाव पालटून मिर्झा गालिब जीवन गौरव पुरस्कार केले

अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनाचा परिपोष चालूच ! उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे दिल्या जाणार्‍या पुरस्काराचे नाव पालटण्याचा प्रस्ताव यायलाही वेळ लागणार नाही !

मुंबई – अल्पसंख्यांक विकास विभागाच्या उर्दू अकादमीच्या वतीने दिल्या जाणार्‍या संत ज्ञानेश्‍वर पुरस्काराचे नाव पालटून मिर्झा गालिब जीवन गौरव पुरस्कार करण्यात आले आहे. साहित्य क्षेत्रात चांगली कामगिरी बजावणार्‍या साहित्यिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुरस्काराचे नाव पालटल्याचा आदेश शासनाने काढला असून त्यावर अवर सचिव अनीस शेख यांची स्वाक्षरी आहे.

१. अल्पसंख्यांक विभागातील कक्ष अधिकारी फारूख पठाण हे पुरस्काराचे नाव पालटण्यामागे असण्याची शक्यता अकादमीच्या ९ सदस्यांनी तक्रारवजा व्यक्त केली; कारण त्यांना पुरस्काराचे नाव पालटल्याचे माहीतच नव्हते. विशेष कार्य अधिकारी डॉ. चारुदत्त शिंदे यांनी खात्याचे मंत्री विनोद तावडे यांची स्वाक्षरी घेतली असावी, असे बोलले जात आहे. (याविषयी विनोद तावडे यांनीही शासनाची भूमिका स्पष्ट केली पाहिजे ! – संपादक)

२. आघाडी शासनाच्या काळातही या पुरस्काराचे नाव पालटण्याचा प्रयत्न केला गेला नव्हता. सध्याच्या शासनाने यापूर्वी साहीर लुधियानवी पुरस्काराचेही नाव पालटून वली दख्खनी पुरस्कार केले आहे.

३. वर्ष २०१५ ते २०१७ या ३ वर्षांत उर्दू अकादमीने उर्दू साहित्यिकांना पुरस्कारच दिलेले नाहीत.

संतांचे नाव पालटून शायराचे नाव देणे, ही बौद्धिक दिवाळखोरीच ! – हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड

संस्कृतीचे रक्षक म्हणवणार्‍यांनी संत ज्ञानेश्‍वर पुरस्काराचे नाव पालटणे दुर्दैवी आहे. संतसाहित्य हा राष्ट्राचा आत्मा आहे. अशा संतांच्या नावाची अन्य कुणासह तुलनाही होऊ शकत नाही. हा एकप्रकारे संत ज्ञानेश्‍वर माऊलींचा अवमानच आहे. एखाद्या

पुरस्काराला दिलेले संतांचे नाव पालटून शायराचे नाव देणे, हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. विद्यमान सरकारने संतांना डावलण्याचा कृतघ्नपणा करू नये. वारकरी संप्रदायाच्या वतीने या प्रकाराचा आम्ही निषेध करत असून या विरोधात आवाज उठवू.


Multi Language |Offline reading | PDF