आग्रा येथे अमरनाथ यात्रेकरूंवरील आक्रमणाच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आंदोलन करतांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते

आग्रा – अमरनाथ यात्रेकरूंवरील आक्रमण आणि चीनकडून सिक्कीम येथील नाथू-ला जवळील कैलास मानसरोवर बंद करणे, या घटनांच्या विरोेधात येथील भगवान टॉकीज पुलाच्या खाली हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये सनातन संस्था, हिंदु सेना, राष्ट्रीय हिंदू जागरण मंच आणि हिंदु जनजागृती समिती या संघटनांनी सहभाग घेतला. हिंदूंवर अत्याचार करणारे बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे सरकार तात्काळ बरखास्त करावे, अशीही मागणी या वेळी करण्यात आली.क्षणचित्र : आंदोलनाच्या वेळी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now