सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथे विमानात स्फोट घडवण्याचा कट रचणाऱ्यां चौघा आतंकवाद्यांंना अटक

आतंकवादाच्या सावटाखाली ऑस्ट्रेलिया !

सिडनी (ऑस्ट्रेलिया) – विमानात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचल्याच्या प्रकरणी सिडनी पोलिसांनी ४ आतंकवाद्यांना अटक केली. यानंतर ऑस्ट्रेलियातील विमानतळांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अटक केलेले चौघे जण विमानात स्फोट घडवून विमान पाडण्याचा कट रचत होते. हे आतंकवादी कोणत्या विमानात स्फोट घडणार होते ?, विमानतळाच्या आतमध्ये बॉम्ब कसा नेणार होते ?, कधी आणि कुठे हा स्फोट घडवण्याचा कट होता?, या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करत असून चौघांची कसून चौकशी चालू आहे, असे पोलिसांनी सांगितले. हे चौघेही इस्लामचे कट्टर समर्थक होते, अशी माहितीही पोलिसांनी दिली. ऑस्ट्रेलियामधून आतापर्यंत अनुमाने १०० तरुण इसिसमध्ये भरती झाले आहेत. यांतील काही जण सिरिया आणि इराक येथून पुन्हा ऑस्ट्रेलियात परतल्याचे वृत्त आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now