लासलगाव येथील मुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतकऱ्यांकडून सरसकट कर्जमाफी आणि हमीभाव यांच्या मागणीसाठी घोषणाबाजी

नाशिक – लासलगाव येथील मुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत सरसकट कर्जमाफी आणि हमीभाव द्यावा, अशी मागणी केली. कोल्ड स्टोरेजच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांचे भाषण चालू असतांनाच हा प्रकार घडला. शेवटी मुख्यमंत्र्यांनी घोषणाबाजी करणाऱ्यां शेतकऱ्यांना खडसावत खाली बसण्याची विनंती केली; मात्र शेतकऱ्यांनी घोषणाबाजी चालूच ठेवली.

येथील शिवडे गावातील शेतकऱ्यांनी स्वत:च्या रक्ताने समृद्धी महामार्गाच्या विरोधासाठी पत्रही लिहिले आहे. त्यामुळे विरोध करण्यात आला.


Multi Language |Offline reading | PDF