धर्मांधाने दुबईहून अवैधरित्या आणलेले सोने कह्यात

गुन्हेगारीत बहुसंख्य असलेले अल्पसंख्यांक !

मुंबई – दुबईहून मुंबईत आलेल्या मोहम्मद रिसद या धर्मांधाने अवैधरित्या आणलेले ८६० ग्रॅम सोने मुंबई विमानतळावरील सीमाशुल्क अधिकार्‍यांनी कह्यात घेतले. या सोन्याचे बाजारमूल्य २५ लक्ष ३७ सहस्र रुपये आहे. त्याने सोने मिक्सरमध्ये दडवून आणले होते. विमानतळावर त्याची वर्तणूक संशयास्पद वाटल्याने सीमाशुल्क अधिकार्‍यांनी त्याच्या साहित्याची पडताळणी केली असता सोने आढळले.


Multi Language |Offline reading | PDF