श्रीलंकेने हंबनटोटा बंदर चीनला विकले

भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे धोकादायक असून या संकटाला भारतीय सुरक्षायंत्रणा कशा प्रकारे सामोर्‍या जाणार ?

कोलंबो – श्रीलंकेने सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे हंबनटोटा बंदर चीनच्या एका सरकारी आस्थापनाला ७२ अब्ज रुपयांना विकले आहे. या आस्थापनाची या बंदरामध्ये ७० टक्के भागीदारी असणार आहे. या बंदराच्या सुरक्षेचे दायित्व श्रीलंकेच्या नौदलाकडेच असणार आहे, असे या करारामध्ये नमूद करण्यात आले आहे. हे बंदर चीनकडे गेल्यास चीनचे नौदल तेथे येणार आहे. त्यामुळे भारताने श्रीलंकेला विरोध केला होता. तसेच श्रीलंकेतील नागरिकांकडून त्याला विरोध करण्यात येत होता. त्यामुळे या करारात हा पालट करण्यात आला आहे. श्रीलंकेच्या बंदरे विकास मंत्री महिंदा समरसिंघे म्हणाले की, कोणत्याही परदेशी नौदलास येथे तळ बनवण्याची अनुमती दिली जाऊ शकत नाही.


Multi Language |Offline reading | PDF