वाळपई येथे ३ गायी आणि ३ वासरे यांची गोरक्षकांकडून सुटका

गोव्यातील गोहत्याविरोधी कायदा न पाळणारे कसाई आणि त्यांना पकडू न शकणारे पोलीस !

वाहनात बांधलेला गोवंश

वाळपई, ३० जुलै (वार्ता.) – कर्नाटकातून गोव्यात हत्येसाठी वाहतूक करण्यात येत असलेल्या ३ गायी आणि ३ वासरे यांची गोरक्षकांनी ३० जुलै या दिवशी सुटका केली. गोरक्षकांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर संबंधित चारचाकी वाहन जप्त करण्यात आले असून वाहनचालकाला अटक करण्यात आली आहे. सुटका केलेल्या गोवंशाला वाळपई येथील अखिल विश्‍व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्रात पाठवण्यात आले आहे. (पोलीस आणि प्रशासन गायींची अनधिकृत वाहतूक करणार्‍यांना आणि त्यांची हत्या करणार्‍यांना पकडू शकत नसल्याने गोरक्षकांना कारवाई करावी लागते. असे असूनही काही लोकप्रतिनिधी आम्हाला गोव्यात गोरक्षक नकोत, असे म्हणतात. या लोकप्रतिनिधींना गोव्यातील गोहत्याविरोधी कायदा धाब्यावर बसवून गायींची होणारी ही अनधिकृत वाहतूक आणि हत्या चालते का ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF