फुटीरतावाद्यांवरील कारवाईस मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचा विरोध

काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती यांच्या समवेत भाजपही सत्तेत आहे, त्यामुळे त्याने मेहबूबा यांना उघडपणे विरोध केला पाहिजे !

श्रीनगर – पाककडून येणार्‍या पैशांद्वारे काश्मीरमध्ये दगडफेक आतंकवाद करणार्‍या फुटीरतावाद्यांवर केंद्र सरकारकडून कारवाई करण्यात येत आहे. त्याला राज्याच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी विरोध केला आहे. त्या म्हणाल्या, ‘तुम्ही कोणत्याही विचारांना मारू शकत नाही कि त्यांना कारागृहात टाकू शकत नाही.’

भारत-पाक यांच्यामध्ये सीमेवरून होणारा व्यापार बंद होऊ देणार नाही

श्रीनगर ते पाकमधील मुझफ्फराबाद यांमध्ये सीमेवरून व्यापार केला जातो. ‘हा व्यापार बंद करावा’, अशी शिफारस राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने केली आहे. या व्यापाराच्या माध्यमातून पाकमधून आतंकवाद्यांना आणि फुटीरतावाद्यांना पैसे पुरवले जातात. आतापर्यंत १ सहस्र कोटी रुपयांहून अधिक रुपये याद्वारे काश्मीरमध्ये पाठवण्यात आले. तसेच येथून अमली पदार्थांचा व्यापार केेला जातो; मात्र या शिफारसीला मेहबूबा मुफ्ती यांनी विरोध केला आहे.


Multi Language |Offline reading | PDF