ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनल्यापासून संशयाचा सामना करावा लागला ! – अमेरिकी मुसलमान

केवळ अमेरिकेतच नव्हे, तर जगभरातील मुसलमानांवर संशय का घेतला जातो ?, याचे आत्मपरीक्षण ते करतील का ?

न्यू यॉर्क – डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यापासून आम्हाला मोठ्या प्रमाणावर संशयाचा सामना करावा लागला आहे. तथापि वैयक्तिक पातळीवर आम्हाला अमेरिकी नागरिकांकडून पाठिंबाही मिळत आहे, असे मत अमेरिकेतील मुसलमानांनी व्यक्त केले.

भविष्यात अमेरिकी समाजाकडून त्यांना पूर्णपणे स्वीकारले जाईल, असा विश्‍वासही अमेरिकेतील मुसलमानांनी व्यक्त केला.

१. ‘प्यू रिसर्च सेंटर’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार ७५ टक्के मुसलमानांनी ट्रम्प आपलेसे वाटत नसल्याचे सांगितले आहे.

२. आम्हाला अमेरिकेतील मुख्य समाजप्रवाहाचा भाग समजले जात नाही, अशी प्रतिक्रिया ६२ टक्के मुसलमानांनी दिली.


Multi Language |Offline reading | PDF